You can edit almost every page by Creating an account. Otherwise, see the FAQ.

सृष्टी क्रम बृहत् संहिता

From EverybodyWiki Bios & Wiki

[1]


References[edit]

  1. मिश्र, सुरेशचन्द्र. डाॅ. नई दिल्ली: रंजन पब्लिकेशन्स. Search this book on

││ श्री ││


संहिताचे रचिता वराहामिहिर आहे. संम्पूर्ण विषय विस्तारपूर्वक जिथे समावलेला आहे, त्याला संहिता म्हणतात. गणित, फलित, संहिता हया त्रिस्कंधापैकी संहिता हे देवज्ञांचे मुलाधार स्थान आहे.


बृहत् संहितानुसार सृष्टीक्रमः


विश्वाच्या उत्पत्ति पुर्वी समस्त विश्व अंधकारमय होते. सृष्टीच्या उत्पत्तिच्या हेतुने पितामह ब्रम्हाने सर्वप्रथम जलमय सृष्टी बनवली व त्या जलामध्ये स्वतःचे तेज स्थापित केले. पंच महाभूतांपैकी प्रत्येकात एक एक शक्ति आहे. पण परस्पर संयोगा शिवाय उत्पत्ति होऊ शकत नाही. पंचमघभूतांची (पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश) शक्तिचे एकत्रित परस्पर संयोग होऊन एक महाकाय असे अंडे निर्माण झाले. मेरुपर्वत हया अंडयाचे बाध्य आवरण होते. व इतरपर्वत हे जरायु – गर्भाशय तर समुद्रे – गर्भजल होते. त्या अंडयातुन कालांतराने ब्रम्हदेवाचे जन्म झाले. हे अंडे सोन्याप्रमाणे तेजस्वी होते. साक्षात महाविष्णूनेच हिरण्यगर्भ व्दारा अवतार घेतला. हया अंडयाचे दोन भागात विभाजन झाले. १) स्वर्गलोक २) भूमिलोक. या दोन लोकांमधील पोकळीला (शुन्य) आकाश म्हणतात. हे अंडे पंचमहाभूतांनी व महत्व व प्रधान प्रकृति (अव्यक) हयांनी ही वेढलेले होते, अशा सात आवरणांनी हे अंड वेढलेले होते. हया अंडयाव्दारा महाविष्णूनेच (विश्वस्त्र) सुर्य व चंद्र रुपी दोन नेत्रधारी ब्रम्ह उत्पन्न केले. यांची पुष्टी ऋगवेद व स्मृति मध्ये मिळते –


सांख्य दर्शकचे प्रवर्तक कपिल मुनि म्हणतात सृष्टीची उत्पत्ति प्रकृति, प्रधान, अव्यक्ता पासुन झाली आहे. हे विश्व स्वयंभू उत्पन्न झाले आहे. त्याला कोणी निर्माण करु शकत नाही. अव्यक्त म्हणजे जे व्यकत करु शकत नाही, अशी शक्ति. हयाच प्रधान तत्वापासुन महायधि सात पदार्थ तयार होतात.


महर्षि कणाद यांनी वैशेषिक सांख्य दर्शन मध्ये द्रव्य पदार्थ परमाणु रुप तत्वापासून जगत उत्पत्ति सांगितली आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आकाश, काल, दिव्य आत्मा, मन हया ९ द्रव्यांनी गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय व आभाव हया ७ पदार्थांनी जगत उत्पत्तिचे कारण आहे. असे म्हटले आहे.


असे दोन परमाणुचे व्दयणूक, नीनचे त्र्यणूक ई. बनते तसे स्थल दृश्यमान जगतची उत्पत्ति झाली.


1. द्रव्येः – ९ आहेत पृथ्वी, जल, अग्नि, वायु आकाश, दिशा, काळ, आत्मा, मन ज्यावर गुण/क्रिया रहातात ते द्रव्य होये. अणुद्रवे – पृथ्वी, जल, अग्नि, वायु मन हे आहेत. मूर्त द्रव्ये ही आहेत यांवर संयोग होऊन मध्यम द्रव्ये होतात तर आकाश, दिशा, काळ, आत्मा हे नित्य द्रव्ये आहेत, हे अमूर्त आहेत. विभू व व्यापक आहेत. तसेच अग्नि, जल, वायु पृथ्वी व आकाश हे भूत द्रव्ये आहेत.


2. गुणः – २४ आहेत रुप, रस, गंध, शब्द, स्पर्श, संख्या, संयोग, संस्कार, बुद्धी, द्रवत, विभाग, परिणाम, प्रथ्वक, गुरुत्व, परत्व, अपरत्व, धर्म, अधर्म, स्नेह, व्देष, सुख, दुःख, इच्छा, प्रयत्न – गुण म्हणजे जे द्रव्यावर रहतात त्यावर दुसरे गुण/क्रिया रहात नाही. यातहि

सामान्य गुणः – एकावेकी अनेक द्रव्यांवर रघतोः संख्या, परिश्रम, परत्व, अपरत्व, पृथक, संयोग, विभाग.

विशेष गुणः – एकाचवेळी एकाच द्रव्यावर असतो. रुप, रस, गंध, स्पर्श, बुद्धी, इच्छा, सुख, दुःख, प्रयत्न, स्नेह.

मूर्न गुण, अमुर्न गुण हे इतर गुण आहेत. एक इंद्रिय ग्राहय गुण – रुप डोलयांनीच दिसेत, स्पर्श त्वचेनेच जानवेन.

व्दिइंद्रिय ग्राहय गुण – दोन इंद्रियानी ज्याचे ज्ञान होते.

अतिंद्रिय – कोणत्याही इंद्रियाने ज्ञान होत नाही ते, जसे गुरुत्व.

मनोग्राहय – अंतर इंद्रिय ग्राहय गुण, बुध्दि, सुख, दुख, इच्छा, प्रयत्न, व्देष.


3. कर्मः – पाच प्रकारचे कर्म आहेत, १) उत्पेक्षण – वर जाणे, २) उपेक्षण – खाली पडणे, ३) आकुंचन, ४) प्रसरण, ५) गमन, दोन पदार्थाचा संयोग होऊन जे होण्यासाठी वेडाके कारण असते ते कर्म जसे झाडावरुन फळ खाली पडणे हे फलाचे कर्म होय.


4. सामान्यः – विशेष नाही असे.

उदाः – चकली वेटोकेदार, काटेदार गोल असते हे विशेष गुण आहे, पण लाडु गोल आहे हे सामान्य गुण होय.

याचेधी दोन प्रकार आहेत.

१) परसामान्यः – जे द्रव्य अनेक ठिकाणी राहु शकते – पाणी ग्लास मध्ये आणि कपा मध्ये.

२) अपरसामान्यः – जे द्रव्य विशेष ठिकाणी रहाते ते – दूध विशिष्ट भांडयातच ठेवावे लागते.


5. विशेषः – दोन पदार्थांच्या संयोगाने जे विशेष असे अस्तित्व होते ते विशेष होय. जसे चकली सामान्य गुण पण भाजणी विशेष गुण आहे.


6. समावयः – एक पदार्थ दुसरा पदार्थावर आहे हे ज्ञात असतानाही आपण त्यास भिन्न/अलग करु शकत नाही त्यास समावय म्हणतात.

उदाः – जलामध्ये पडणारे प्रकाश किरणे.


7. अभावः – पदार्थात द्रव्य असुनही एखादया गोष्टीचा अभाव असणे/नसणे चार प्रकार आहेत.

१) प्राणभावः – ज्यास उत्पत्ति नाही पण शेवट आहे एखादी गोष्टी उत्पत्ति आधिचा आभाव – जसे पूर्वी संगणक नव्हते अभाव,

२) प्रध्वंसाभावः – उत्पत्ति अजुन शेवट नाही, असा अभाव जसे जन्म झाला ही उत्पत्ति मृत्युमुळे त्या व्यक्तिचा अभाव शेवट पर्यंत कायम रहातो, भरुन निघत नाही तो अभाव.

३) अंत्यानाभावः – जो पदार्थ जो आहे हे सिद्ध झाल्यावर तो पदार्थ दुसरा कोणताही अन्य पदार्थ नाही याचा अभाव. उदाः डबा आहे हे निश्चित झाल्यावर ते पेन, पुस्तक नाही याचा अभाव. म्हणजे डबा ही वस्तु व्यतिरिक्त इतर वस्तु नाही त्याचा अभाव आहे.


अशाप्रकारे ७ पदार्थांचा जगत उत्पत्ति कारण आहे असे महर्षि कणाद यांनी म्हंटले आहे इतर आचार्यांच्या मते ₺कालः सृजाति भुतानि₺ - अर्थात कालच जगत उत्पत्तिचे कारण आहे.


लोकांच्या मते सृष्टी आपणहुनच बनली आहे. जसे कांटयामध्ये नुकीलापन, ऊसामध्ये गोडवा, नीमच्या पानात कडुता स्वभातःच आहे, तसे हे जगत पण स्वाभाविक रुपानेच उत्पन्न झाले असाणे.


मीमांसकांच्या मते, कर्म – शुभाशुभ कर्म विश्व उत्पत्तिचे कारण आहे. शुभकर्म – शुभास्थिती, पापकर्म – अशुभस्थिती हे कर्मच सृष्टीचे निर्मितीचे कारण आहे. पण सृष्टी निर्माण मध्ये प्रधान, स्वयंभु, कर्म, काल, परमाणु काही संभोधले तरी परम सत्य हे आहे की सृष्टी निर्माण झाली आहे.


जगतची उत्पत्ति करताना ब्रह्मदेवाने प्रथम देवांच्या पासुन स्थावर पर्यंत चार प्रकारची सृष्टी निर्माण केली.

1. देवसृष्टी – सत्वरुप – दिवस

2. असुरसृष्टी – नमोगुण – रात्र

3. पितृगण सृष्टी – आंशिक सत्व – संध्याकाळ

4. मानव सृष्टी – आंशिक तम – पहार


अशाप्रकारे दिवसा देव व रात्री असुर पहाटे मानव व संध्याकाळी पितृगण बलवान असतात. दिवस – रात्र – देव – असुर हे ब्रह्मदेवाचीच शरिरे आहेत.


सृष्टी निर्माता ₺परमब्रम्ह₺ हे एकच आहे. शास्त्रध्यांच्या मतानुसार (संशोधनातून) हे विश्व शुन्यातून उभे राहिले असुन बिंदुमात्रा अश्या अस्तित्वाशी प्रचंड उर्जा होती. एकाक्षणी त्या उर्जेचा स्फोट झाला व त्यातुन विश्वनिर्मिती झाली. या सिध्दांतावर आधावर शोध सुरु आहे.


This article "सृष्टी क्रम बृहत् संहिता" is from Wikipedia. The list of its authors can be seen in its historical. Articles copied from Draft Namespace on Wikipedia could be seen on the Draft Namespace of Wikipedia and not main one.